तिरंगी मालिकेत विंडीज-श्रीलंका आज आमनेसामने

किंगस्टन – वेस्ट इंडिज संघ मायदेशातील तिरंगी मालिकेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेशी गाठ पडणार आहे. या तिरंगी स्पर्धेत चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता ढोणीची टीम इंडिया देखील सहभागी होणार आहे. या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची सलामीची झुंज येत्या रविवारी होणार आहे.

काही दिवसांपुर्वीच खेळल्या गेलेल्या् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विंडीजची कामगिरी निराशाजनक होती. श्रीलंकेने मात्र उपांत्य फेरीत धडक मारली होती. साखळी लढतीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया , इंग्लंडला हरवले बाद फेरीत मात्र त्यांना इंग्लंडने चकवून अंतिम फेरीत धडक मारली. विंडीजला या स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययाच्या फटका बसला. तिरंगी स्पर्धेसाठी विंडीजने आपल्या चमूतूत सरवान, होल्डर यांना वगळले असून यष्टिरक्षक रामदिन एका सामन्याच्या बंदीनंतर संघात पुनरागमन केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे या स्पर्धेवरही पावसाचे सावट आहे. २००७ वर्ल्डकपनंतर श्रीलंकन संघ विंडीजच्याफ दौ-यावर आला आहे. वर्ल्डकपमध्ये श्रीलंका संघ उपविजेता होता. येथील वातावरणात त्यांची फिरकी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. अजंता मेंडिस, सचित्र सेनानायक, रंगना हेरथ यांचा श्रीलंकन संघात समावेश आहे.

Leave a Comment