युटीव्ही स्टार्स इन युवर सिटीची पुणे सफर

बॉलीवूडचे स्टार्स दर्शकांच्या आणखी जवळ आणण्याचा प्रयत्न यु टीव्ही स्टार्सच्या ‘स्टार्स इन यूअर सिटी’ या कार्यक्रमात होतो. या अत्यंत यशस्वी उपक्रमाचा एक भाग म्हणून अभिनेत्री पूजा गुप्ताने शैक्षणिक शहर असलेल्या पुण्याला भेट दिली.

ही प्रतिभाशाली अभिनेत्रीने जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आपल्या चाहत्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत आपला काही वेळ घालवून पुणे शहराच्या शानदार अनुभवांचा आनंद घेतला. तिच्या या दौर्‍यामध्ये तिने शहरातील गणपती बाप्पाची पूजा केली आणि कुमठेकर रोडच्या स्थानिक बाजारपेठेत खरेदीदेखील केली. यूटीव्ही स्टार्सने या अभिनेत्रीला आणि तिच्या चाहत्यांना काही संस्मरणीय अनुभव देखील प्रदान केले. अभिनेत्री पूजा गुप्ता म्हणाली, पुणे हे एक उत्कृष्ट शहर आहे आणि येथील बर्‍याच गोष्टी प्रसिद्ध आहेत. मी अत्यंत खूश आहे की, यूटीव्ही स्टार्सने वैयक्तिक स्तरावर चाहत्यांशी जोडण्याची मला संधी दिली. मी हे शहर फिरण्याचा अनुभव अशाप्रकारे कधीही घेतला नव्हता, जो मला आज मिळाला. शहरामध्ये फिरणे आणि येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा अनुभव खूपच शानदार राहिला आहे. पुण्याला क्वीन ऑफ डेक्कन का म्हटले जाते हे आता मला कळत असल्याची तिने सांगितले.

Leave a Comment