माधुरी पुन्हा थिरकणार आयटम सॉंगवर

धकधकगर्ल माधुरी दीक्षितने ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात आयटम सॉंग केल्यानंतर पुन्हा एकदा डान्सासाठी ती तयार झाली आहे. संजय लीला भन्सालींच्या आगामी चित्रपटात माधुरी आयटम सॉंगवर थिरकणार आहे. आगामी काळात ती पुन्हा एकदा ‘रामलीला’ या सिनेमातून डान्स करताना दिसणार आहे.

माधूरीने सिनेमा क्षेत्रात जोरदार आगमन केले आहे. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये नुकतेच माधुरीने तिचे गुरु पं. बिरजू महाराज यांच्यासोबत डोळे दिपवणारी नृत्य जुगलबंदी सादर केली होती. ‘देढ इश्किया’ या चित्रपटात ती मुजरा करणार असून, पं. बिरजू महाराज यांनी त्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते. तसेच ती येत्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सिनेमाची शंभरी साजरी करताना तिच्या कारकिर्दीतील काही गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे.

गेल्याच काही सिनेमातून दमदार डान्सत करत माधूरीने पुनरागमन केले आहे. तिने तरुण अभिनेत्यांना लाजवेल असे आयटम सादर करून नवीन येणा-या गर्ल्सना माधुरी दीक्षितने तगडे आव्हान दिले आहे.

Leave a Comment