फेडरर, शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात

लंडन: गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या विम्बल्डन स्पेर्धेमध्ये धक्कादायक निकालाची मालिका सुरूच आहे. राफेल नदाललाया स्पसर्धे पहिल्याच सामन्यात पराभव पत्काररावा लागला होता. आता त्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि रशियाच्या मारिया शारापोव्हा यांचे एकेरीतले आव्हान दुस-याच फेरीत संपुष्टात आले आहे.

विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररला युक्रेनच्या सर्जी स्ताखोवस्कीने ६-७,७-६,७-५,७-६ असे सरळ सेटमध्येन नमवले. तब्बल सात वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणा-या फेडररला जागतिक क्रमवारीत ११६व्या स्थानावर असलेल्या स्ताखोवस्कीने पराभूत केले.

अर्नेस्ट गल्बिसने त्याच्यावर मात केली. तर महिला एकेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हालाही स्पनर्धेबाहेर पडावे लागले आहे. पोर्तुगालच्या मिशेल लार्चर डीब्रिटोने मारियावर ६-३, ६-४ अशी मात केली आणि मारिया दुसऱ्याच फेरीत बाद झाली. त्याचबरोबर वर्ल्ड नंबर टू व्हिक्टोरिया अझारेन्काने दुखापतीमुळे विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. तसेच पुरुष एकेरीच्या आणखी एका सामन्यात फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाचंही आव्हान दुस-या फेरीत संपुष्टात आले.

Leave a Comment