मृतांची ओळख पटवण्याचे कठीण आव्हान

नवी दिल्ली – उत्तराखंडमधील प्रलयानंतर हजारो नागरिकांना वाचपिण्यात सरकारला यश आले आहे. या प्रलयांकरी दूर्घटनेत अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. काही जणांचे मतदेह हाती लागले आहेत. त्या मुळे येत्या काळात मृतांची ओळख पटवण्याची कठीण आव्हान आहे. या सर्व गोंधळात उपलब्ध असलेले फोटो किंवा डीएनए चाचणीच्या मदतीने मृतांची ओळख पटवण्याची कठीण जबाबदारी संबंधित अधिका-यांवर पडली आहे.

उत्तराखंडमध्ये आलेल्या पूराला गुरुवारी १३ दिवस पूर्ण झाले. हिंदू धर्मानुसार, १३ दिवसांत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. पण अनेक मृतदेहांची ओळख अजूनही पटली नसल्यामुळे अंत्यविधीसाठी दिरंगाई होत आहे. उत्तराखंड सरकारने वेवसाईट्वर काही मृतांचे फोटो अपलोड केले आहेत. मात्र अद्यापही त्यांची ओळख पटलेली नाही. काही मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. पण मृतदेह सडल्यामुळे त्याचा फारसा फायदा होत नाही.

पूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याकडे अधिका-यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.त्यामुळे मृतदेहांकडे फारसे लक्ष देता न आल्याने बहुतांशकरुन हे मृतदेह मोकळ्या जागीच ठेवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रोगराई परसण्याचा धोका अधिक वाढला आहे.या दुर्घटनेत हरवलेल्या लोकांचे त्यांच्या नातेवाईकांनी दिलेले फोटोसुद्धा वेबसाईटवर अपलोड केले जात असले तरीही फोटोनुसार चेहरा जुळवणे ही अधिका-यांची डोकेदुखी ठरत आहे.