स्वत:च पार्क होणारी कार

वॉशिंग्टन दि.26 – चालक गाडीतून उतरल्यावर स्वत:च पार्किंग शोधून पार्क होणारी आणि आपण कुठे पार्क झालो आहोत याची माहिती चालकाला स्मार्टफोनवर देणारी कार व्होल्व्होने विकसित केली आहे. सध्या याचे तंत्रज्ञान कन्सेप्ट कार पुरतेच मर्यादित असले तरी भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरात येईल असा विश्वास संशोधकांनी व्यकत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पार्किंग लॉटमध्ये गेल्यावर चालक गाडीखाली उतरला तरी गाडीवर असलेल्या सेन्सरच्या सहाय्याने तो स्मार्टफोनचा वापर करून गाडीला नियंत्रित करू शकणार आहे. गाडी ऑटो वॅलेट सर्व्हि6सच्या मदतीने अन्य वाहनांना न थडकता तसेच आजूबाजूच्या लोकांनाही धक्के न मारता मोकळी जागा शोधून पार्क होणार आहे. पार्किंगची जागा चालकाला कळावी म्हणून तसा मेसेजही स्मार्टफोनवर देणार आहे. सध्याच्या वाहनतळांतही ही कार आपली आपण पार्क होऊ शकतेच पण भविष्यात रेडिैओ ट्रान्समीशनची सुविधा असलेले वाहनतळ उभारले जातील तेव्हा वाहनतळात नक्की मोकळी जागा कुठे आहे याचा मेसेच गाडीला मिळू शकेल व पार्किंग अधिक सोपे होईल असेही सांगण्यात येत आहे.