कंगना- कुणालशी जुळली दोस्ती

गेल्या काही दिवसांपूवी अध्ययन सुमनशी असलेले अफेअर तुटल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत एकाकी पडलेली होती. आता त्याधनंतर कंगनाचे सुर दिग्दर्शक कुणाल देशमुखशी जुळले आहेत. गेल्या काही दिवसांत या दोघांना एकत्र फिरताना काही जणांनी पाहिले आहे. कंगनाने कुणालला गिफ्ट दिल्याचीही चर्चा आहे. कुणाल आणि कंगना एकमेकांना आधीपासून ओळखत आहेत. त्यामुळे त्यांची फार चांगली मैत्री जमली आहे.

तसे पाहिले तर कुणाल आणि कंगना दोघेही भट्ट कॅम्पशी निगडीत आहेत. दोघेही परस्परांच्या संबंधांबाबत बोलण्यास मात्र दोघेही उत्सुक नाहीत. आपल्या दोघांत शुद्ध मैत्री असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच कुणाल आणि कंगनाला एकत्रित फिरताना पाहिले आहे. त्यामुळेच दोघेजण रिलेशनशिप मध्ये असलयाची चर्चा आहे.
याबाबत बोलताना अभिनेत्री कंगना म्हणाली, ‘माझी आणि कुणलची फक्त मैत्री आहे. त्यामुळे आम्‍ही दोघेजण एकत्रित फिरत असतो. मात्र त्या्चा काही जणांनी वेगळा अर्थ काढला आहे. सध्या् मी आगामी काळात येत असलेल्याने सिनेमाच्या शुटिंगमध्‍ये व्यस्त आहे.

Leave a Comment