
पुणे,दि..26संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मार्गक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार माऊलींची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजेच 30 जूनला समाधी मंदिरातून प्रस्थान करेल, तर तुकाराम महाराज पालखी 29 जूनला इनामदार वाड्यातून प्रस्थान करणार आहे.
माऊलींच्या पालखीचा पहिल्या दिवशीचा मुक्काम आळंदीत आहे. एक आणि दोन जुलैला पालखी पुणे मुक्कामी राहणार आहे. तीन आणि चार जुलैला सासवड, पाच, सहा जुलैला जेजुरी, वाल्हे, सात आणि आठ जुलैला लोणंद, नऊ जुलैला तरडगाव, दहा आणि 11 जुलैला फलटण 12, 13, 14, 15, 16 आणि 17 जुलैला अनुक्रमे वरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि 18 जुलैला पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. दरम्यान, नऊ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे. 14 जुलैला सदाशिवनगर पहिले गोल रिंगण, 15 जुलैला खुडूस फाट्याला दुसरे गोल रिंगण, 16 जुलैला ठाकुरबुवाच्या समाधीजवळ तिसरे गोल रिंगण होईल. 17 जुलैला वाखरीजवळ दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण, तर 18 जुलैला विसवावीजवळ तिसरे उभे रिंगण होणार आहे.
जगदुरु तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे असणार आहे. 1 आणि 2 जुलै रोजी पालखी सोहळा पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठठल मंदिर येथे, 3 जुलै रोजी लोणीकाळभोर, 4 जुलै रोजी यवत, 5 जुलै वरवंड, 6 जुलै उंडवडी, 7 जुलै बारामती सांस्कृतिक भवन, 8 जुलै सणसर, 9 जुलैला अंथुर्णे, 10 जुलै निमगाव केतकी, 11 व 12 जुलै इंदापूर मुक्कामी, 13 जुलैला सराटी, 14 जुलैला अकलूज, 15 जुलैला बोरगाव, 16 जुलैला पिराची कुरोली, 17 जुलैला वाखरी येथे मुक्कामी असणार आहे. तर 18 जुलैला पंढरपूर नगरीत आगमन व पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम होईल. दरम्यान, 9 जुलै रोजी बेलवडी येथे पहिले गोल रिंगण, दुसरे गोल रिंगण 11 जुलै रोजी इंदापूर येथे, तिसरे गोल रिंगण 14 जुलै रोजी सदाशिव माने विद्यालय येथे, 15 जुलै रोजी पहिले उभे रिंगण माळीनगर येथे, दुसरे उभे रिंगण 17 जुलैला बाजीराव विहिर येथे तर तिसरे उभे रिंगण वाखरी येथे होणार आहे. तसेच वाखरी येथे पादुका अभंग आरती होणार आहे.
