
पुणे,दि.26:गेल्या चार पाच वर्षातील पुस्तकनिर्मितीतील अडचणी लक्षात घेवून राज्यशिक्षणमंडळाने पाठयपुस्तके अंशत: खाजगी प्रकाशकाकडून तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यशिक्षण मंडळ इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची काही पुस्तके खाजगी प्रकाशकाकडून तयार करून घेणार आहे. त्यात शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून इयत्ता नववी ते बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे व या अंतर्गत भाषेतर विषयांची इंग्रजी व मराठी माध्यम सोडून उर्वरित माध्यमाची पाठ्यपुस्तके भाषांतरे करून घेणार आहे.
