कॉंगे्स -जदयू युतीची शक्यता

नवी दिल्ली् – काही दिवसापूर्वीच बिहारमधील जनता दल युनायटेडने भाजपमधील आघाडीमधून बाहेर पडल्यालने आता विविधि पक्षानी जुळवाजुळव सुरू केली आहे. आगामी काळात कॉंगे्स-जदयू युतीचे संकेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहेत. धर्मनिरपेक्ष व्यक्ती आणि धर्मनिरपेक्ष राज्य या दोहोंच्याही पाठीशी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला असल्याकचे त्यांनी म्हमटले आहे.

आपला पक्ष नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे सांगताना त्यांनी आगामी काळात कॉंगे्रस-जदयू युतीच्या शक्यतेचे संकेतही दिले आहेत. धर्मनिरपेक्ष व्यक्ती आणि धर्मनिरपेक्ष राज्य या दोहोंच्याही पाठीशी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला आहे. एकमेकांना सहकार्य करणे हीच धर्मनिरपेक्ष शक्तींची जबाबदारी आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.जातीयवादी शक्ती या देशावर राज्य करू शकणार नाहीत. केवळ धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षच देशावर सत्ता करू शकतात, असे सांगताना ते म्हणाले की, मी जेव्हा खासदार होतो, त्यावेळी नितीशकुमार हे देशाचे रेल्वे मंत्री होते. मी त्यांना फार आधीपासून ओळखतो. ते खरोखरच चांगले आहेत. अशी स्तुती शिंदे यांनी केली.

बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करताना जेव्हापासून काँग्रेसच्या चार आमदारांनी नितीशकुमारांच्या बाजूने मतदान केले. तेव्हापासून काँग्रेस आणि जदयूमध्ये भविष्यात युती होण्याचा अंदाज लावला जात आहे. काँग्रेसने पक्षाचे उपाध्यक्षांच्या सल्ल्यानुसार २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये आपला जुना मित्र लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी नाते तोडले आहे आणि तेव्हापासून सर्व निवडणुका स्वबळावर लढत आहे.

Leave a Comment