नरेंद्र मोदी पंजाबमधून रणशिंग फुकणार

पठाणकोट- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची रविवारी पंजाबमधल्या माधोपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून निवडणूक प्रचाराची सूत्रे स्विकारल्यानंतर मोदींची ही पहिलीच सभा आहे. याच सभेत नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुक २०१४ चे रणशिंग फुकणार आहेत. मोदींना नेतृत्व सोपवल्यानंतर नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडनं एनडीएला रामराम ठोकलाय. त्यामुळे मोदी या सभेत नितीशकुमारांचा कसा समाचार घेतात? याकडं सगळ्याचं लक्ष असेल.

पंजाबात होणा-या या सभेत मोदी पाकिस्तान विषयकही आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गेलेल्या या कार्यक्रमात मोदींची उपस्थित सगळ्यांचे लक्ष खेचून घेतेय. रविवारी जवळपास सहा तास मोदी पठानकोठमध्ये असतील.

रविवारची सभा यशस्वी करण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादलही आजच्या सभेत सहभागी होणार आहेत.

Leave a Comment