
शाहरुख खानचं मराठीत पदार्पण बॉलिवूडचा बादशाहा बनल्यावर आता शाहरुख खान मराठी सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण मराठीतलं शाहरुखचं पदार्पण हे सिनेमासाठी नसून मराठी अल्बमसाठी असणार आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘सावली’ या अल्बममधील गाण्यासाठी संगीतकार शेखर राजिवानी याने शाहरुख खानला गळ घातली. शाहरुख खान ताबडतोब तयारही झाला. या अल्बममध्ये सुनिधी चौहानही त्याच्यासोबत दिसणार आहे. तर ‘बालक पालक’ सिनेमातील चिऊ आणि अव्याही यामध्ये सिनेमातील पात्रांच्याच रूपात दिसणार आहेत.
