वनडे रॅँकिंगमध्ये टीम इंडिया अव्वल

लंडन – गेल्या काही सामन्यात टीम इंडियाने विजयी मालिका सुरुच ठेवली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुरुवातीच्या तीन सामन्यात विजय मिळवल्याने आयसीसी वनडे रॅँकिंगमध्ये टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज व पाकिस्तानाला भारताचे रेटिंग गुण ११९ हून वाढून १२१ झाले आहेत.

दुस-या स्थानावर इंग्लंडची टीम ११३ गुणांसह आहे. ऑस्ट्रेलिया तिस-या क्रमांकावर, तर द. आफ्रिका ११२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आगामी काळात भारताची गाठ सेमीफायनलमध्ये श्रीलकेशी पडणार आहे. हा सामना जिंकल्यास अथवाचॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यास भारताच्या गुणांत वाढ होऊ शकते.

गुण पुढील प्रमाणे – भारत ( १ २ १ ) गुणासह पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया १ १ ३ गुणासह दुस-या स्थानावर आहे. दक्षीण आफ्रिका (११२), श्रीलंका १०९ , पाकिस्तान १०२ , न्यूझीलंड ८८ , वेस्ट इंडीज ८८, बांगलादेश ७५, झिम्बाब्वे ५५ गुणासह शेवटच्या स्थानावर आहे.

Leave a Comment