पावसाची सुट्टीदिवशी राज्यभरात जोरदार बँटिंग

मुंबई : पावसाने रविवारी सुट्टीदिवशी राज्यभरात जोरदार हजेरी लावली. पुण्यासह सर्वात्र शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे येणा-या एक्स्प्रेसही पावसामुळे रखडल्या आहेत.

पुण्यासह राज्यात सर्वात्र जोरदार पाऊस येत आहे. महाराष्ट्रात नेहमीपेक्षा दोन तीन दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूनने आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. राज्याच्या सर्वच भागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पहिल्या दोन आठवड्यात सरासरीपेक्षा ९४ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

दरम्यान, येत्या ४८ तासात मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वा-यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यावर मान्सून स्थिरावल्याने सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. दरवर्षी उशीराने येणा-या पावसाचा यंदा वेळेवर हजेरी लावली आणि संसतधार सुरू असल्याने पेरणीला दिवसभर तरी उघडीप मिळण्याची गरज आहे.