पुणे-मुंबई रेल्वे विस्कळीत

पुणे- शनिवारी रात्रीपासून कोसळणा-या मुसळधार पावासाचा फटका रेल्वेला बसला आहे. रविवारी सकाळी पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती. दरम्यान, ही गाडी मुंबईकडे दोन तास उशिराने रवाना झाली. त्यामुळे रविवारी दिवसभर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील आकुर्डी जवळ राविवारी सकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. महावितरणाची ही उच्च दाबाची वायर पडल्याने पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणा-या एक्सप्रेस आणि सर्व लोकल गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. दोन तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग खुला करण्यात आला.

दोन तासानंतर पिंपरी स्थानकात थांबविण्यात आलेली डेक्कन क्वीन मुंबईकडे सकाळी नऊ वाजता रवाना झाली. दरम्यान त्यानंतर हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. रविवारी पुण्यातही पावसाचा जोर वाढला आहे.