एक रोमॅण्टिक कॉमेडी… ‘कुणी घर देता का घर’

‘नटसम्राट’ या गाजलेल्या नाटकातील आप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडी असलेले हे स्वगत आज हजारो मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातील सल ठरत आहे. स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण घरांच्या वाढत्या किंमतीमुळे प्रत्येकालाच ते सहज खरेदी करता येईल याची शाश्वती नसते. अशा कठीण परिस्थितीत घराचा ठिकाणा नसताना एखादयाने पळून जाऊन लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला तर… त्याला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागेल या धमाल कथा आशयावर ‘सागर बंगेरा पॉडक्शन’ निर्मित, ‘शिल्पा फिल्मस’ प्रस्तुत ‘कुणी घर देता का घरहा विनोदी चित्रपट येऊ घातलाय.

येत्या 28 जूनला हा मराठी चित्रपट राज्यात सर्वत्र पदर्शित होतोय त्याआधी चित्रपटाच्या गीतांची ध्वनिफीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. हेमंत बंगेरा निर्मित या चित्रपटाची सहनिर्मि ती शीला मंगेश जगताप यांनी केली असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा विविध माध्यमात सहज वावरणारे राजेश देशपांडे यांनी आजवर मालिका, नाटक, चित्रपटांतून मनोरंजनासोबत सामाजिक आशयही उत्तमपकारे मांडला आहे. त्यांच्या ‘कुणी घर देता का घरया आगामी चित्रपटात देखील त्याचा प्रत्यय येणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व गीते दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनीच लिहिली आहेत.

चित्रपटात विविध शैलीतील 6 गीते असून अवधूत गुप्ते, रोहन पधान, पाजक्ता शुके, उर्मिला धनगर, नेहा राजपाल, सावनी रविंद्र या गायकांनी आपल्या सुरेल आवाजात ती गायली आहेत. या गीतांना युवा संगीतकार रोहन पधान व अमीर हडकर यांनी संगीत दिले आहे. उर्मिला धनगर यांनी ‘चांदवा बहरात.. रात्रीच्या पहरात..’ हे रोमॅण्टीक अदिवासी लोककला पकारातील गीत गायले असून गायिका नेहा राजपाल यांनी ‘सग्यासोयऱयाची दाटी, मधे हळदीची वाटी..’ असे बोल असणारे हळदीचे गीत गायले आहे. दोन्ही गीते शब्दपधान असून प्रेक्षकांना ती नक्कीच आवडतील अशी आहेत.

‘कुणी घर देता का घर’चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे या चित्रपटात सावनी रविंद्र आणि रोहन प्रधान यांच्या आवाजातील एक पॅरेडी साँग आहे. या पॅरेडी साँगमध्ये जुन्या गाजलेल्या 6 मराठी गीतांना आधुनिक साज देण्यात आला आहे. चित्रपटातील ‘ही प्रेमकहाणी…’ हे लव्ह साँग पाजक्ता शुके व रोहन पधान यांनी गायलं आहे. या गीतांचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून छायाचित्रण संतोष शिंदे यांचे तर कला दिग्दर्शन- सतीश बिडकर यांनी केले आहे. चित्रपटाचे संकलन राजेश तिवारी यांनी केले असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप सांभाळीत आहेत.

चित्रपटाची कथा आहे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या कुणाल आणि नताशाची. घरच्यांचा विरोध पत्करुन ते पळून जाऊन लग्न करतात. पुढे त्यांच्या आयुष्यात येणारे चित्रविचित्र पसंग आणि त्यातून घडणा-या गमतीजमती याची उत्सुकता वाढविणारी कथा यात पहायला मिळणार आहे. भरत जाधव, कांती रेडकर, विजू खोटे, कुलदिप पवार, विजय चव्हाण, रीमा लागू, दिपक शिर्के, जयवंत वाडकर, कमलाकर सातपुते, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, किशोर पधान, शोभा पधान, वर्षा दांदळे, शुभांगी लाटकर, विमल म्हात्रे, सुहास पळशीकर, छाया कदम, अतुल तोडणकर, शैलेश पितांबरे, जयराज नायर असे अनेक लोकपिय कलाकार ‘कुणी घर देता का घरमध्ये एकत्र आले आहेत.