झी टॉकीजवर महाराष्ट्राचे सुपरस्टार्स स्पेशल

आयपीएलमधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिस्किंगमुळे क्रिकेटशौकिनांना बसलेला जबर धक्का, पुण्यात बारावीच्या निकालातला सावळा गोंधळ, दहावीच्या रिझल्टनंतर महाविद्यालयात प्रवेशांसाठी रांगा, उत्तर महाराष्ट्रातल्या दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतक-याला लागलेले पावसाचे वेध, पहिल्याच पावसाने वाहतुकीचा बोजवारा…महागाईने आधीच ग्रासलेल्या सामान्य जनतेचय
डोळ्यात आता कांध्याच्या वाढत्या दरानेही आणलय पाणी…या सगळ्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसासाठी दिलासा म्हणून मनोरंजनाची धमाकेदार पर्वणी झी टॉकीज घेऊन येतेय. महाराष्ट्रांचे सुपरस्टार स्पेशल चित्रपटांचा खजिना झी टॉकीज येत्या आठवड्यात म्हणजे १७ ते २३ जून मध्ये दुपारी १२ ते रात्री ९ वाजता सादर करणार आहे.

या महाराष्ट्राचे सुपरस्टार स्पेशल मध्ये दररोज एका लोकप्रिय कलाकाराच्या गाजलेल्या चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळेल. यात सचिन पिळगांवकर, सचिन खेडेकर, अशोक सराफ, संजय नार्वेकर, भरत जाधव, अतुल कुलकर्णी आणि मकरंद अनासपुरे या कलाकारांचे गाजलेले चित्रपट बघायला
मिळणार आहेत. सोमवारी १७ जूनला लिव्हिंग लेजंड कलाकार सचिन अभिनीत चित्रपट पहायला मिळतील. दुपारी १२ वाजता ‘अष्टविनायक’, ३ वाजता ‘शर्यत’, सायं.६ वाजता ‘नवरा माझा वसाचा’ आणि रात्री ९ वाजता ‘आम्ही सातपुते’ तर मंगळवार, १८ जूनला सचिन खेडॆकर स्पेशल – ‘ता-यांचे बेट’, ‘अस्तित्व’, ‘बळीराजाचं राज्य येऊ दे’, ‘काकस्पर्श’, बुधवारी १९ जूनला अशोक सराफ यांचे ‘एक डाव धोबीपछाड’, ‘मालमसाला’,‘ बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘अशीही बनवाबनवी’, गुरूवारी २० जूनला संजय नार्वेकर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘आई नं.१’, ‘खबरदार’, ‘आता गं बया’, शुक्रवारी २१ जूनला भरत जाधवचे ‘जत्रा’, ‘पछाडलेला’, ‘वन रूम किचन’, ‘येड्यांची जत्रा’. शनिवार २२ जूनला अतुल कुलकर्णीचे ‘वळू’, ‘भेट’, ‘नटरंग’. रविवार २३ जूनला मकरंद अनासपुरे अभिनीत ‘गाढवाचं लग्न’, ‘पिपाणी’, ‘तीन बायका फजिती ऎका’, आणि ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ अशा सदाबहार चित्रपटांचा नजराणा लवकरच रसिकांना झी टॉकीजवर अनुभवता येणार आहे.

Leave a Comment