दुस-या दिवशीपण अडवाणी मारणार दांडी

पणजी: गोवा येथे सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हजर राहणार नाहीत.शुक्रवारी देखील त्यांनी याच कारणामुळे दांडी मारली होती. त्यांच्या गैरहजरीमुळे वेगळीच चर्चा रंगली होती.

गोवा येथे सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा गाजावाजा आहे. त्यामुळेच अडवाणींनी दांडी मारल्याची चर्चा आहे. अडवाणींना आलेला ताप हा मोदींचा ताप असल्याचे बोलले जात आहे . नरेंद्र मोदीं यांना अडवाणी यांचा विरोध उघड आहे. पण या बैठकीवर मोदींचा प्रभाव असल्यानेच अडवाणी ही बैठक टाळतात की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आठ आणि नऊ तारखेला होणा-या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित राहण्याची अडवाणींची ही पहिलीच वेळ असेल.

तिकडे गुजरातचे मुख्यंत्री नरेंद्र मोदींना २०१ ४ च्या निवडणुकीच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नेमण्यासाठी भाजपच्या कार्यकारिणीत, उद्या तारखेला घोषणा होण्याची शक्यता आहे. पण अडवाणींच्या अनुपस्थिती अशी घोषणा करण्यास सुषमा स्वराज यांचा विरोध आहे.

Leave a Comment