गेल्या काही दिवासाचा अनुभव पाहता अभिनेत्री बिपाशा बसु ही दिग्दर्शक विक्रम भट्टची फेवरिट ठरली आहे. त्यामुळेच आता आगामी काळात येत असलेल्या बिपाशाच्या सिनेमात भट्ट ‘क्रियेचर थ्री डी’ या सिनामातून झळकणार आहे. या सिनेमात बिपाशा सोबत पाकिस्तानमधील मॉडेल इमरान अब्बास बॉलीवुडमध्ये एन्ट्री करीत आहे.
इमरानच्या जवळच्या सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने तो खूपच उत्साहित आहे. याबाबत बोलताना इमरान म्हणाला, ‘ बिपाशा सोबत काम करताना खूप आनंद वाटला. बिपाशा ही एक मेहनती अभिनेत्री आहे. निर्माता म्हणून विक्रमने माझ्यावर विश्वास दाखविला. त्या पद्धतीने काम मी या सिनेमात केले आहे.’
गेल्या काही दिवसापासून ‘क्रियेचर थ्री डी’ या सिनेमाची शूटिंग ऊटी मध्ये होत आहे. उटी शूटिंगसाठी सुंदर जागा आहे. त्यामुळे अनेक सिनेमाचे शूट याठिकाणी होते. आगामी काळात लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.