स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राज कुंद्राची चौकशी

नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण दररोज नवनवीन मोड घेत आहे. या प्रकरणी आता राजस्थान रॉयल संघाचा संघमालक राज कुंद्रा याला चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी बोलावले आहे. राज कुंद्रा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आहे. या प्रकरणी यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे

पोलीसानी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक केली आहे. या तिघांनीही आपण काही चूक केलीच नसल्याचे म्हटले आहे. या तिघांसह या प्रकरणात दोषी असलेल्या २६ जणांविरोधात मोक्का लावण्याची तयारी दिल्ली पोलिसांनी सुरु केली आहे. त्यामुळे श्रीशांतला जामीनही नाकारण्यात आला आहे.

या प्रकरणी मुंबई तसेच दिल्ली पोलिस राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंची कसून चौकशी करत आहेत. तर आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगच्या मुळाशी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा हस्तक छोटा शकील असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.