प्रेमाच्या त्रिकोणामुळे केली जियाने आत्महत्या

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस कसून चौकशी करित आहेत. अभिनेत्री जिया खानने प्रेमातील त्रिकोणामुळे आत्महत्या केली असावी असा सध्या पोलिसांचा कयास आहे. त्या दृष्टीने सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. दरम्यान अभिनेता आदित्‍य पंचोली यांचा मुलगा सूरज पंचोली सोबत तिचे अफयेर सुरु होते. त्यामुळे पोलिसांनी मंगळवारी सुरजची चौकशी केली.

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार जिया खानचे शेवटचे बोलणे सूरज पंचोली सोबत झाले होते. गेल्या एक वर्षापासून जिया आदित्‍य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली सोबत ती डेट करीत होती. त्याच्या या लव स्टोरीमध्ये एक मुलगी आली होती. तिच्या एंट्रीमुळे गेल्या काही दिवसांपासून जिया नाराज होती.

जियाच्या मि‍त्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दोघामध्ये मोबाइलवर ६३ मिनिट बोलणे झाले आहे. त्या शिवाय दोघांनी एसएमएस पण पाठवले आहेत. त्या मुलीमुळे सूरज जि‍याकडे लक्ष देत नव्हता असे दोघातील बोलण्यातून स्पष्ट होते. त्यामुळेच मंगळवारी रात्री बॉलीवुड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली. जियाने अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि आमिर खान सोबत काम केले होते.

Leave a Comment