युवी घेतोय ६० कोटींचे आलिशान घर

मुंबई दि.५ – कॅन्सरशी यशस्वी मुकाबला करून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग मुंबईतील वरळी भागात बहुमजली स्क्रॅपर इमारतीत आलिशान घर घेतो आहे. १६ हजार स्क्वेअर फुटाचा संपूर्ण मजलाच युवीने पसंत केला असून त्याची किमत आहे ६० कोटी रूपये. ओंकार रिअॅलिटर्स हे या इमारतीचे डेव्हलपर आहेत.

कॅन्सरमधून पूर्णपणे मुक्त झाल्यानंतर युवराजने त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले असून कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी डिटेक्शन सेंटर्सही त्याने सुरू केली आहेत. युवराज मुंबईत घेत असलेले घर हे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील असल्याचे सांगितले जात असून किमतीबाबत त्याची आई शबनम या बिल्डरशी बोलणी करत आहेत.

ओंकार बिल्डर्सचे संचालक गौरव गुप्ता यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी युवराजचे नांव न घेता कांही क्रिकेटर्सनी घर खरेदीसाठी संपर्क साधल्याचे सांगितले. त्यात दोन फास्ट बॉलर्स असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पात तीन इमारती असून त्या प्रत्येकी ७० मजल्यांच्या आहेत आणि प्रत्येक मजला १६ हजार स्क्वेअर फूटांचा आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment