सलमान आणि कैटरिना पुन्हा सोबत

आगामी काळात जर सर्व काही ठीक झाले तर सलमान खान आणि अभिनेत्री कैटरिना कैफ एक सोबत काम करताना दिसतील.हे दोघे जन कुठल्या सिनेमात एकत्रित लीड रोल करीत नसून ते एका सिनेमातील आयटम सॉंगवर एकत्रित थिरकणार आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सावन कुमार टांकचा १९ ८३ साली हिट झालेला ‘सौतन’ या सिनेमाचे सीक्वल तयार करीत आहेत. या सिनेमाचे सीक्वल तयार करण्याचा ते खुप दिवसांपासून विचार करीत होते. आता त्यांनी ‘सौतन-२’ हा सिनेमा निर्मितीला सुरुवात केली आहे. लवकरच या सिनेमाच्या शुटला सुरुवात होणार असल्याचे ही सावन कुमार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

या सिनेमात त्यांनी ‘शायद मेरी शादी का ख्याल’ हे त्या काळातील हिट गाणे पुन्हा घेतले आहे. मात्र या गाण्याचे संगीत त्यांनी बदलले आहे. या सीक्वल ‘सौतन-२’ सिनेमातील एका आयटम सॉंगसाठी त्यांनी सलमान आणि कटरीनाच्या जोडीला राजी केले आहे. कटरीनाला त्यांनी एसएमएस करून कन्फर्म केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी सलमानच्या स्पोक्सपर्सनशी चर्चा केली आहे. सावन कुमारने स्वताहून संपर्क केला असल्याने सलमान देखील हे गाणे करेल असे त्यान वाटते. त्यामुळे आगमी काळात पुन्हा एकदा सलमान खान आणि अभिनेत्री कैटरिना कैफ एक सोबत काम करताना दिसतील.

Leave a Comment