महेंद्रसिंग धोनीच आता सर्वांचे टार्गेट

नवी दिल्ली: आयपीएल फिक्सिंग प्रकरणात अंडरवर्ल्डपासून बुकी-खेळाडूंपर्यंत अनेकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी व इतर तीन खेळाडूंच्या जाहिरातींबाबतचे सर्व कामकाज पाहणा-या रिती स्पोर्टसमध्ये धोनीचा हिस्सा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशभरातील माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीका केली असून आता सर्वांनीच धोनीला टार्गेट केले आहे. त्यामुळे धोनी समोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे या सर्व प्रकारानंतर रिती स्पोर्टस या कंपनीने मात्र सारवासारव केली असून धोनीचे या कंपनीत समभाग यापूर्वी होते आता नाहीत असे स्प्ष्टीकरण दिले आहे.

चौकशीत रिती स्पोर्टसमध्ये धोनीचे १५ टक्के समभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यासोबतच ही कंपनी सुरेश रैना, रविंद्र जाडेजा व प्रग्यान ओझा या तीन क्रिकेटपटूंच्या जाहिरातींचेही व्यवस्थापन करते. तरीही भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी धोनीवर टीका केली आहे.

याबाबत बोलतना माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले , माजी क्रिकेटपटू एजन्ट म्हणून काम करीत असेल तर त्याला आक्षेप नाही पण प्रज्ञान ओझासारख्या फिरकी गोलंदाजाला अचानक बढती मिळते आणि ज्या जाडेजावर आयपीलमध्ये बंदी घालण्यात आली आहे त्याला २० लाख डॉलरला खरेदी केले जाते , याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरते आहे. या कंपनीकडे पुरेसे आर्थिक बळ नाही पण त्यांनी धोनीला समभाग दिले कसे आणि नंतर त्याचे पैसेही कसे परत केले ? अस प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment