हैदराबादवर राजस्थानचा विजय

नवी दिल्ली- हैदराबाद सनरायझर्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात राजस्थान रॉयल्सने चार गडी आणि चार चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना झटपट बाद केल्याने राजस्थानचा डाव गडगडला असतानाही होडगेने २९ चेंडूत ५४ धावा करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सहा चेंडूत विजयासाठी १० धावा हव्या असताना होडगेने लागोपाठ दोन सिक्स मारुन विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबाद सनरायझर्सने सात गड्यांच्या बदल्यात १३२ धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्स संघाने १९.२ षटकात सहा बाद १३५ धावा केल्या.

द्रविड १२, रहाणे १८ वॉटसन २४, बीनी २ आणि सॅमसनने १० धावा केल्या. तर याग्निक शून्यावर बाद झाला. फॉल्कनर ११ धावा करुन नाबाद राहिला. सामीने दोन गडी बाद केले. तर स्टेन, आय. शर्मा, के. व्ही.शर्मा आणि परेराने प्रत्येकी एक गडी बाद केला.

हैदराबाद सनरायझर्सला आता अंतिम फेरीत जाण्यासाठी २४ मे रोजी मुंबई इंडियन्सशी दोन हात करावे लागणार आहेत.

Leave a Comment