स्पॉट फिक्सिंगचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी ?

मुंबई-आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगने सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पाकिस्तानातील ३० बुकींनी फोन केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे पाकचा यासंबधी हात असल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे याप्रकरणाचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी आहेत का ? याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. दरम्यान पोलसांनी गुरुवारीपण या प्रकरणी अनेक जनाची चौकशी केली.

आयपीएल सामन्यांतील सट्टेबाजी प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही बुकींना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या ९२ फोनपैकी ३० फोन केवळ पाकिस्तान आणि भारतातील बुकींच्या एकमेकांशी संपर्कासाठी वापरले जात होते, असे समोर आले आहे .या फोनमधील काँटॅक्ट लिस्टमधून सुमारे १० – १२ पाकिस्तानी तर ५ ते ७ भारतीय बुकींचे संपर्क मिळाले असून त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे .

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या बुकींच्या चौकशीतून समोर आलेली नावे तसेच दिल्ली पोलिसांना हवे असलेले काही बुकी समान असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली. तपासात पाकिस्तानातील ३० बुकींनी फोन केल्याचे उघड झाल्याने याप्रकरणाचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी आहेत का ? याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. या सर्व प्रकारची चौकशी झाल्यानंतर सत्य काय ते पुढे येण्याची शक्यता आहे.