चूक झाल्याची श्रीसंतची कबुली;पाच दिवसाची कोठडी

नवी दिल्ली: आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अडकलेल्या मध्यमगती गोलंदाज एस. श्रीसंत सह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना पाच दिवसाची कोठडी सुनवण्यात आली आहे. दरम्यान, एका मल्याळम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माझी चूक झाली असल्याची कबुली राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंत यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत या तिन्ही खेळाडूंना आयपीएलमधून निलंबित करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांना अटक केली. याप्रकारामुळे भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांनी फिक्सिंगचा पर्दाफाश करीत या तिघांच्या कृत्याचा ठोस पुरावा दिला. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंचे आयपीएलमधून निलंबन झाले आहे. याप्रकरणी त्यांना कोर्टासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment