मनीषाने जिंकली कॅन्सर विरोधातली लढाई

क्रिकेटपटू युवराज सिंग प्रमाणेच बॉलीवूडची अभिनेत्री मनीषा कोईराला हिने गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेली कॅन्सर विरोधातली लढाई जिंकली आहे. कॅन्सरच्या विळख्यातून ती आता बाहेर आली असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली. मनीषा कोईराला गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिकेत ओव्हरीयन कॅन्सरवर उपचार घेत होती.

याबाबत बोलताना अभिनेत्री मनीषा कोईराला म्हणाली, ‘ मला जेव्हा कळले की, मी कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर आली आहे, तेव्हा मला रडू कोसळले. मला पुन्हा नव्याने आरोग्य लाभणार आहे. हे सर्व तुमच्या भावना आणि आशीवार्दामुळे शक्य झाले आहे. माझा पुर्नजन्मच झाला असून यासाठी माझा परिवार, कॅन्सर क्लब मेंबर्स, तसेच फेसबुक आणि टि्वटरवरील चाहत्यांनीही या काळात माझे धैर्य वाढवले.’

अभिनेत्री मनीषा कोईलरालाचा जन्म नेपाळमध्ये झाला. तिचा १९९१ साली आलेला सौदागर हा सिनेमा विशेष गाजला, त्यानंतर १९४२ अ लव्ह स्टोरी, अग्नीसाक्षी, बॉम्बे, खामोशी या सिनेमातील तिचा रोल गाजला होता. कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर पडल्याने सध्या ती खुश आहे.

Leave a Comment