सोन्याच्या भावात पाचशे रुपयांनी घसरण

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरूच आहे. जगभरातील सोन्याचे भाव उतरल्यानंतर थोडीशी भाववाढ होताच साठेबाजांनी मोठ्या प्रमाणावर सोने विक्री केल्याने भाव पन्हा उतरले आहेत. सोन्याचे भाव दहा ग्रॅममागे पाचशे रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतींनी या महिन्यातील नीचांक गाठला आहे. चांदीचे दरदेखील एक हजार रुपयांनी कमी होऊन प्रतिकिलो ४3 ,७० ० रुपये एवढी झाले आहेत.

सिंगापूरमधील सोन्याच्या उलाढालींवरून सामान्यता देशांतर्गत सोन्याचे भाव ठरतात. सिंगापूरमधील सोन्याचे भाव ०.४ टक्क्यांनी उतरले आहेत. हा १९ एप्रिलनंतरचा सोन्याच्या भावाचा नीचांक आहे. चांदीचे दरदेखील एक हजार रुपयांनी कमी होऊन प्रतिकिलो ४ ३ ,७ ००० रुपये एवढी झाली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये एक तोळ्याचा भाव २६, ८० ० रुपये एवढा आहे. जगभरातील सोन्याचे भाव उतरल्यानंतर थोडीशी भाववाढ होताच साठेबाजांनी मोठ्या प्रमाणावर सोने विक्री केल्याने भाव उतरले आहेत. गेल्या गुरुवारी अचानक सहाशे रुपयांनी भाव उतरल्यानंतर १७ एप्रिल रोजीच्या सोन्याच्या भावाशी बरोबरी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. सध्या लग्न सराई सुरु आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकाची झुंबड उडाली आहे.

Leave a Comment