नवी दिल्ली- आयपीएल मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसी आणि बीसीसीआय गाफील राहिली आहे. दिल्ली पोलिसांनी आयपीएल मधील स्पॉट फिक्सिंगचा गौप्यस्फोट करताना तीन सामन्यांचे पुरावे दिले आहेत. मात्र खेळाडू आणि बुकींनी वापरलेली पद्धत बघता अन्य सामन्यांचीही चौकशी करावी अशी मागणी आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी केली आहे.
दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी टीम राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आली. स्पॉट फिक्सिंगवरून श्रीसंत सह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक करून पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनवण्यात आली.
दोन वर्षापूर्वी आयपीएलच्या कामात अनियमितता आढळल्याने आयपीएलचे कमिशनर असलेल्या ललित मोदी यांना वगळण्यात आले होते. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, ‘ आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगसाठी खेळाडू आणि बुकींनी वापरलेली पद्धत बघता अन्य सामन्यांचीही चौकशी करण्याची गरज आहे. त्यातून काही सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.