सोनाक्षी झाली आता पेंटर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंह यांचा आगामी काळात ‘लुटेरा’ हा सिनेमा येत आहे. यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने खूपच मेहनत घेतली आहे. तिला या सिनेमातील रोल साठी पेंटिंग शिकावे लागले आहे. तिला पेंटीगची आवड असल्याने हे शिकत असताना तिला कसलीच अडचण आली नाही.

याबाबत बोलताना अभिनेत्री सोनाक्षी म्हणाली, ‘लूटेरा या सिनेमासाठी तिने खुप मेहनत घेतली आहे. यासाठी तिने काही कठिन शूटिंग सुद्धा केले आहे. या सिनेमात परफॉर्मेंसच्या दृष्टीने आतापर्यन्तचा सर्वश्रेष्ठ अभिनय केला आहे. या सिनेमाचे शूट करीत असताना मी पेंटिंगची आवड देखील पूर्ण केली आहे. या मध्ये मी जमीनदारच्या मुलीचा रोल केला आहे.’

विक्रमादित्य मोटवानेच्या मते सोनाक्षीने या सिनेमात चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनाक्षीचे बॉडी लैंग्वेज रोलला शोभेल असेच आहे. एक पेंटर जसा ब्रश पकड़ता व पेंटिंगमध्ये रंग भरतो त्याप्रमाणे अचूक काम तिने केले आहे. रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘लुटेरा’ हा सिनेमाची कथा अमेरिकन शॉर्ट स्टोरी रायटर ओ हेनरी की ’द लास्ट लीफ’ यावर आधारित आहे.