स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांतसह तिघांना अटक

नवी दिल्ली- यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही स्पॉट फिक्सिंग झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तीन खेळाडूना गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा संशयाच्या भोव-यात सापडली आहे. पोलिसांनी एस. श्रीशांत आणि बुकींना दिल्लीत अटक करण्यात आली.

काही दिवसापूर्वी आयपीएल-६ मधील काही सामने फिक्स असल्यची चर्चा होती. विशेषता मोहाली आणि मुंबईत झालेले काही सामने ‘फिक्स’ असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज पहाटे राजस्थान रॉयल्सचं त्रिकूट आणि सात बुकींना अटक केली. एस. श्रीशांत आणि बुकींना त्यांनी दिल्लीतून ताब्यात घेतले , तर अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाला मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमधून अटक केली. वानखेडेवरील मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी ते संघासोबत आले होते. त्यांना आता दिल्लीला नेले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये दोषी आढलयास आणखी काही जणांना अटक होऊ शकते.

काही दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांच्या हाती बुकी आणि खेळाडूंमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाची टेप लागली होती. त्यावरून, हे स्पॉट फिक्सिंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या खब-यांकडून त्यांनी संबंधित बुकींचा पत्ता मिळवला. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment