ऐक्शन आणि रोमांचपूर्ण असलेला ‘शूटआउट ऐट वडाला’ या सिनेमाच्या सक्सेस नंतर आता दिग्दर्शक संजय गुप्ता या कथेवर आधारित आता आणखीन एक दूसरी स्टोरी प्लान करीत आहे. आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन, आणि जॉन अब्रहमला संधी देण्याचा विचार ते करीत आहेत.
सूत्राने दिलेल्या या माहितीनुसार हा सिनेमा इंडियाचे लीडिंग एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळस्कर यांच्यावर आधारित असणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन विजय आणि जॉन अब्राहम पुलिस अधिका-याचा रोल प्ले करणार असल्याचे समजते. या कथेचा कमी पार्ट हिस्ट्रीमधून घेतला आहे. २००८ साली झालेल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे.
आता या सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहण्याचे काम सुरु आहे. स्क्रीपट लिहून झाल्यानंतर या सिनेमाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. एका प्रॉडक्शन कंपनीच्या सोर्सने सांगितले की, जॉन आणि अभिषेक अक्टूबरमध्ये ‘दोस्ताना-२’ या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदा ‘शूटआउट…’ की ‘दोस्ताना -२ ‘ हा सिनेमा सुरु होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.