चेन्नई- आयपीएलच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअर डेव्हिल्सवर 33 धावांनी विजय मिळवला.प्रथम फलंदाजीकरत चेन्नईने दिल्लीपुढे विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दिल्लीला 20 षटकात नऊ बाद 135 धावा करता आल्या. याविजयासह चेन्नईने 22 गुणांसह पुन्हा एकदा गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
दिल्लीवरील विजयासह चेन्नई पुन्हा अव्वल स्थानी
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला. माइक हसी आणि मुरली विजय यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. विजय 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर हसीही 26 धावांवर लगेच बाद झाला. तर सुरेश रैनारी सात धावांवर बाद झाला. चेन्नईची अवस्था तीन बाद 74 अशी झाली असताना. ढोणी आणि जडेजा यांनी 57 धावांची भागीदारी केली. चेन्नईकडून ढोणीने 35 चेंडूत 58 धावा केल्या. यामुळेच चेन्नईला 20 षटकात चार बाद 168 धावा करता आल्या.
विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा अपशाची मालिका सुरुच ठेवली. दिल्लीकडून डेव्हीड वॉर्नर (44) वगळता अन्य कोणालाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.
