मुशर्रफ यांच्या कोठडीत वाढ

इस्लामाबाद, – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता दिसत नाही. बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांच्या कोठडीची मुदत आता आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. टाडा कोर्टाचे न्यायाधिश न्या चौधरी हबीबउर रहमान यांच्या न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्यावेळी त्यांची कोठडी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावीणी अपेक्षीत होती ती मात्र रद्द करण्यात आली असून हंी सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे. मुर्शरफ सध्या त्यांच्याच फार्म हाऊस मध्ये अटकेत आहेत. त्यांच्या फार्म हाऊसला उपतुरूंगाचा दर्जा देण्यात आला आहे.

Leave a Comment