संजय दत्तला शरण येण्यास आणखी वेळ देण्यास नकार

नवी दिल्ली, दि. 14 – अभिनेता संजय दत्त याला मशरण येण्यास आणखी वेळ देण्या सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा नकार दिला आहे. मुंबई बाँबस्फोटखटल्यात पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तला अजून साडेतीन वर्षांची शिक्षा भोगायची आहे. त्यासाठी त्याला शरण येण्यासआणखी वेळद्यावा अशी मागणी करणारी याचिका एका चित्रपट निर्मार्त्याने केली होती तीफेटाळताना न्यायालयाने त्याला निर्धारीत मुदत तुरूंग अधिकार्‍यापुढे शरण येण्याची सूचना केली आहे.

आपल्या चित्रपट संस्थेच्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण बाकी असल्याने त्याला मुदतवाढ द्याी अशी मागणी करणारी याचिका एका चित्रपट निर्मात्याने केली होती ती याचिका सुनावणीला घेण्यास न्या बी एस चौहान आणि न्या दीपक
मिश्रा यांच्या खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे संजय दत्त पुढे आता 15 मे रोजी तुरूंगअधिकार्‍यांपुढे शरण येण्या खेरीज पर्याय राहिलेला नाही. या पुर्वी 10 मे रोजी संजय दत्तच्यावतीने त्याला झालेल्या शिक्षेचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका सादर करण्यात आली होती ती याचिकाही न्यायालयाने या आधीच फेटाळली आहे.

गेल्या 21 मार्चला दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला झालेली शिक्षा ग्राह्य धरली होती परंतु त्याच्या शिक्षेचा सहा वर्षांचा कालवधी पाच वर्ष करण्यात आला होता. त्याच्यावतीने अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून त्याला झालेली शिक्षा रद्द अथवा आणखी कमी करण्याची मागणी केली होती परंतु न्यायालयाने त्याला आणखी दिलासा देण्यास ूमात्र नकार दिल्याने संजुबाबाची 16 मे रोजीची तुरूंगवारी आता चुकणार नाही हे निश्‍चीत झाले आहे.

Leave a Comment