वयाच्या चौथ्या वर्षी महापौर

mayor

न्यूयॉर्क, दि. १५ – ज्या वयात शाळेत जायला सुरूवात करायची, मुलांच्यामध्ये खेळायचे, आई-वडिलांकडे हट्ट करायचे, आपल्या समवयस्क मुलांच्या खोड्या काढायच्या त्या वयात म्हणजे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अमेरिकेत एक मुलगा महापौर बनला आहे. अमेरिकेतील मिनिसोटा राज्यात राहणार्‍या या मुलाचे नाव आहे रॉबर्ट टफ्स. तो आतापर्यंत केजी म्हणजे छोट्या गटातील पहिला टप्पाही पास झालेला नाही. परंतु रॉबर्ट हा त्या ठिकाणच्या एका भागाचा महापौर बनला आहे. काही काळापूर्वी त्या भागातील एका महोत्सवादरम्यान रॉबर्ट टफ्सची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये फक्त २२ लोक आहेत.

अमेरिकन बातम्यांनुसार रॉबर्ट हा त्या ठिकाणच्या लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार तो एक वेगळाच मुलगा आहे. ते म्हणतात, भले ही त्याचे शिक्षण पूर्ण झालेले नसेल. त्याने त्या पदाची योग्यता पूर्ण केली नसेल. मात्र तो जनतेच्या सुरक्षेविषयी सर्वात जास्त आग्रह धरतो. तो वयोवृद्धांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तसेच हे महापौर महाशय सुमधूर गाणे गातात, ते नृत्यही करू शकतात. तसेच त्यांचा आवडता छंद म्हणजे मासे पकडणे हा आहे. ते अतिशय चपखलतेने मासे पकडतात.

Leave a Comment