तीन वर्षापूर्वी ‘कमीने’ या सिनेमातून सोबतच अभिनयला सुरुवात करणारे प्रियंका चोप्रा व शाहिद कपूर यांच्यामध्ये रोमांस सुरु असल्याची चर्चा होती. मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगून दोघांनीपण फक्त चांगले दोस्त असल्याचे सांगून टाकले होते. गेल्या काही दिवसापासून मात्र या दोघाचे बोलणे पण बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.
काही दिवसापूर्वीच ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमातील एक गाणे रिकॉडिंगवेळी दोघेजण उपस्थित होते मात्र दोघांनी पण एकमेकांना बघूनपण न बघितल्यासारखे निघून गेले. मुबईमधील मेहताब स्टूडियोमध्ये दोघेपण शुटींगच्या निमिताने एकत्रित आले होते. मात्र दोघांनी पण एक दूस-याकडे साधी नजर सुद्धा फिरवली नाही अशी माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी दिली.
सैटवर उपस्थित असलेल्या सूत्रांच्या मते, ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमातील एक गाण्याच्या रिकॉडिंगवेळी प्रियंका व शाहिद दोघेपण उपस्थित होते. दोघेपण या गाण्याच्या शूटिंगमध्ये सहभागी झाले होते पण दोघांनी चर्चा मात्र केली नाही. काही दिवसापूर्वीच प्रियंका शहीदवर नाराज असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली होती, पण दोघातील संबध एवढे बिघडले आहेत याची माहिती मात्र कुणालाच नव्हती.