नवीन अभिनेत्रीला जर बॉलीवूडमध्ये प्रमोट करायचे असेल तर सर्वच जन बॉलीवूडचा टायगर सलमान खानची मदत घेत असतात. त्याच प्रमाणे सलमान देखील नव्या नायिकांना मदत करीत असतो. सलमान आता त्याची एक्स गर्लफ्रेंड कैटरीना कैफला मदत करीत आहे. सलमान कैटची बहीण इसाबेलला एका सिनेमातून प्रमोट करतो आहे.
गेल्या काही दिवसपासून चर्चा आहे की, सल्लू इसाबेलला मदत करीत आहे. इसाबेलचा पहिला सिनेमा लवकरच येत असून या तिच्यापुढील सर्व अडचणी दूर करीत आहे. महत्वाचे म्हणजे सलमान कनाडा मध्ये ‘डॉक्टर कैबी’ हा सिनेमा प्रोडयूस करीत आहे. हा कैटची बहिण इसाबेलचा पहिला सिनेमा आहे.
‘डॉक्टर कैबी’ या सिनेमात इसाबेलशिवाय विनय विरमानी आणि कुणाल नायर हे नवीन चेहरे झळकणार आहेत. कुणाल या सिनेमातून त्याच्या करियरची सुरुवात करीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन जीन फ्रेंकोइस पुलिओट करीत आहे. गेल्या काही दिवसापासून ‘डॉक्टर कैबी’ या सिनेमाचे शूटिंग कनाड़ा मध्ये सुरु आहे. सलमान आतापर्यंत त्याची एक्स गर्लफ्रेंड कैटरीना कैफला मदत करीत होता. आता तिच्या बहिणीला सुद्धा मदत करण्यात व्यस्त आहे.