मुशर्रफ यांच्या पक्षाचा निवडणुकीवर बहिष्कार

इस्लामाबाद दि.४ – माजी लष्करप्रमुख आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लिग या पक्षाने ११ मे रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार घातला असल्याची घोषणा केली आहे. पक्षाचे प्रवक्ते मोहम्मद अमजद यांनी एका सभेत ही घोषणा केली.

परदेशात कांही काळ अज्ञातवासात काढल्यानंतर पाकिस्तानला वाचविण्यासाठी देशात परतलेल्या मुशर्रफ यांना सतत कोणत्या ना कोणत्या आरोपांना तोंड द्यावे लागत असून सध्या ते बेनझीर भुट्टो यांच्या हत्येस जबाबदार असल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातच पेशावर उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांच्यावर निवडणूक लढविण्यास कायमची बंदी नुकतीच घातली आहे. उच्च न्यायायलाच्या या निर्णयानंतरच पक्षाने निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.