‘वेलकम’मध्ये सनी इन मल्लिका आऊट

आगामी काळात ‘वेलकम’ या सिनेमाचा सिक्वल तयार करण्यात येत आहे. या सिनेमात अक्षय कुमारच्या जागी अभिनेता म्हणून जॉन अब्राहमची वर्णी लागणार आहे. ‘वेलकम बेक’ या सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून सुरुवातीच्या काळात मल्लिका शेरावतला घेण्यात आले होते. मल्लिकाला पण वाटत होते की तिच्या या सिनेमातील रोल फायनल आहे. पण अचानक मल्लिकाचा पत्ता कट करून ‘वेलकम’च्या निर्मात्याने तिच्या जागी सनी लियोनची निवड केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सनी लियोनचे बॉलीवुडमध्ये नाव फेमस झाले असून त्यामुळे प्रत्येक निर्माता आगामी काळात येत असलेल्या सिनेमात तिला एन्ट्री देत आहे. सनिला या सिनेमात काम करण्याची संधी ऐन वेळी चालून आल्याने ती खुश झाली आहे. सध्या ती एकता कपूर सोबत शुटच्या कामात व्यस्त आहे.

या सर्व प्रकारामुळे मल्लिका मात्र नाराज झाली आहे. त्यामुळे आता मल्लिकाचा जादू ओसरला का अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. तिचा जादू ओसल्यानेच त्यामुळेच सनीला ‘वेलकम’ सिनेमाच्या सीक्वल मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

Leave a Comment