रणबीर-दीपिकाने केली धमाल

आगामी काळात येत असलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमातील ‘बलम पिचकारी ने धूम मचा दी है’ या रणबीर कपूरच्या गाण्याने सर्वत्र धूम माजवली आहे. या गाण्यातील दीपिका पदुकोनची मस्ती आणि रणबीरचा जोश पाहता हे गाने एका झटक्यातच हिट झाले आहे.

या गाण्यातील रणबीर आणि दीपिकाचे ट्यूनिंग पाहता त्यांनी खुपच कमाल केली आहे. त्याशिवाय या गाण्यातील त्यांचे एक्सप्रेशन आणि डोळ्यामधून झळकणारे प्रेम यामुळे हे गाणे यू ट्यूबवर सध्या हंगामा करीत आहे. हे गाणे यू ट्यूबवर हिट झाले असून दोन दिवसातच लाखापेक्षा अधिक हिट या गाण्याला मिळाल्या आहेत.

टी सीरीज आणि धर्मा प्रोडेक्शनने हे वीडियो यू ट्यूब वर अपलोड केले आहे. या दोघांना पण याठिकाणी जबरदस्त हिट मिळाले आहेत. ‘ये जवानी है दीवानी’ हे गाने रणबीरने दिल्लीवाल्या गर्लफ्रेंड सोबत केल्याने सर्वाना आवडले आहे. त्यासोबतच आगामी काळात माधुरी दीक्षित ही रणबीर सोबत आयटम सॉंग करणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे सुद्धा गाणे हिट होणार आहे.

Leave a Comment