बेंगळुरू स्फोट तामिळनाडूत 3 संशयीत अटकेत

बेंगळुरू, दि.२३ – बेंगळुरूत भाजपच्या ऑफिसजवळ १७ एप्रिल रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. तर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) स्फोटासाठी आयईडी आणि नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. शक्यता विचारात घेऊन तपास केल्यानंतर तपास पथकाला पहिल्यांदाच मोठे यश मिळाले आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमच्या तिसर्‍या वर्धापनदिनी भाजपच्या ऑफिसबाहेर स्फोट झाला. या स्फोटात १७ जण जखमी झाले होते.

Leave a Comment