’मराठी मालिकेतून होणार स्वित्झर्लंडचे दर्शन’

निर्माता – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच लोकप्रिय झाले
आहेत. टीव्ही मालिकेच्या क्षेत्रात पाऊल टाकताना हाच वेगळ्या धाटणीचा बाज
त्यांनी करण्याचे ठरवले आहे. ’तुझं माझं जमेना’ ही नवी मालिका ते ’झी
मराठी’वर घेऊन येत आहेत. या मालिकेचे शूटिंग स्वित्झर्लंडला करण्यात आले
आहे. परदेशामध्ये शूट होणारी ही पहिलीच मराठी मालिका आहे. ही मालिका 125
एपिसोडसची असून मालिकेत दाखवले जाणारे कुटुंब पुण्यातले आहे. त्यामुळे
स्वित्झर्लंडव्यतिरिक्त मालिकेचं बाकीचं शूटिंग पुण्यात होत आहे. या
मालिकेत रीमा, सुहास जोशी, सविता मालपेकर, मनवा नाईक, वैभव तत्ववादी असे
कलाकार आहेत.