रिचर्ड्सच्या टिप्स दिल्लीला उपयुक्त ठरल्या

नवी दिल्ली – दिल्ली डेअरडेव्हिल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या स्पर्धेत सलग सहा सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात खालचा क्रमांक होता. मात्र दिल्ली डेअरडेव्हिल्सला त्यांच्या खेळीत सुधारणा व्हावी म्हणून मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी काही टिप्स दिल्या होत्या. त्यामुळेच त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला.

यावेळी व्हिव्हियन रिचर्ड्सनने स्वत:वर विश्वास ठेवा आणि बुद्धीने, मनाने कणखर होऊन खेळा, असा सल्ला त्यांनी महेला जयवर्धने आणि त्याच्या सहका-यांना दिला. रिचर्ड्सन म्हणाला ‘स्वत:वर विश्वास असणे आणि बुद्धीने मजबूत, कणखर असणे महत्त्वाचे असते. दिल्लीच्या टीमकडे गुणवत्तेची कमी नाही. ही टीम लवकरच ट्रॅकवर परतेल, याची मला खात्री आहे. संघाचा बदललेला चेहरा येत्या काही दिवसांत सर्वांनाच दिसेल.,’ असे रिचर्ड्स यांनी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी म्हटले होते.

रिचर्ड्सनने दिलेल्या टिप्स दिल्ली डेअरडेव्हिल्सला त्यांच्या खेळीत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरल्या. त्यामुळेच त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग, महेला जयवर्धने यांनी दमदार फलंदाजी करीत विजय मिळवून दिला आहे.

Leave a Comment