आता अक्षयची हिरोइन होणार तमन्ना

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता तमिळचा सुपरहिट फिल्म रामनाच्या हिंदी रिमेक ‘गब्बर’ या सिनेमात मुख्य रोल करीत आहे. अक्षयची हिरोइन फायनल झालेली नसली तरी तमन्नाचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे आता अजय देवगणनंतर अक्षय कुमारला तमन्ना सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

अक्षयला घेऊन नवीन सिनेमा तयार करीत असलेले दक्षिण भारतीय सिनेमाचे दिग्दर्शक क्रिश म्हणाले, ‘मी बॉलीवुडमध्ये प्रवेश करीत असल्याने माझ्यावर थोडा दबाव आहे. मी सध्या घेऊन येत असलेल्या सिनेमाबाबत खूपच उत्साहित आहे. मी आता याबाबत काहीच बोलणार नाही. या सिनेमाची शूटिंग लवकरच सुरु होणार आहे.’

रामनाचा हिंदी रिमेक असलेला ‘गब्बर’ हा सिनेमा सर्वच हिंदी सिनेमाप्रमाणे आव्हानात्मक आहे. संजय भंसाली या सिनेमाची निर्मिती करणार आहे. अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिका करणार आहे. अन्य कलाकाराची निवड देखील करण्यात आली आहे. अक्षयने यापूर्वी संजय लीला भंसालीच्या तेलुगुचा सुपरहिट सिनेमाकार विक्रमाकुडुचा रिमेक असलेल्या ‘राउडी राठौर’ या सिनेमात काम केले आहे.

Leave a Comment