मुबई- गेल्या काही दिवसापासून शानदार फार्ममध्ये असलेला मुंबई इंडियंसचा विकेटकीपर दिनेश कार्तिकला आगामी काळात त्यालाच मॅच फिनिशरची भूमिका निभावावी लागणार आहे. कार्तिकने केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलूर संघाला पराभव पत्करावा लागला होता.
कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरविरूद्धच्या आयपीएल मधील पहिल्या सामन्यात ३७ चेंडूंमध्ये ६० धावा काढल्या. त्यासोबतच चेन्नई सुपर किंग्सच्या विरूद्ध २५ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. याबबत बोलताना कार्तिक म्हणाला, ‘ मी फलंदाजीमुळे खूश आहे. मात्र आगामी काळात मॅच फिनिश करण्याची जबाबदारी माझी आहे. मी बेंगलूरमध्ये फिनिशरची भूमिका करू शकलो असतो. चेन्नईमध्ये पोलार्डने चांगली कामगिरी केली. त्यामुळे मला वाटते की मैच फिनिश करणे गरजेचे आहे. ‘
नवीन कप्तान रिकी पाँटिंग सोबत खेळताना चांगला अनुभव येत आहे. मला रिकी पोंटिंग सोबत फलंदाजी करायला आवडते. सकारात्मक कप्तानीमुळे उर्जा येत असल्याचे कार्तिकने यावेळी बोलताना स्पष्ट केले.