माजी आमदार पप्पू कलानी यांना अटक

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील दोन सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार पप्पू कलानी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पप्पू कलानी यांच्या विरोधात युवराज भदाणे आणि सागर घोलप या दोनमहानगरपालिका अधिकार्‍यांची मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पप्पू कलानी यांनीही या दोन्ही अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका बांधकामासाठी खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती.

पोलिसांनी या दोन्ही बाजूंची तक्रार नोंदवून घेतली असून याप्रकरणी पप्पू कलानी यांना अटक करण्यात आली.

Leave a Comment