नर्वस अनुष्का शर्मा झाली हॉट

अभिनेत्री अनुष्का शर्मा नशीबवान आहे, त्यामुळेच तिला महान दिग्दर्शकासोबत काम करता आले. अनुष्काचा राजकुमार हीरानी सोबतचा ‘पीके’ हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. ती पहिल्यांदाच आमिर खान सोबत काम करणार आहे. मात्र आता तिने तिची झालेली नर्वस इमेज बदलून गेल्या काही दिवसापासून हॉट इमेज केली आहे.

अनुष्का म्हणाली, ‘प्रत्येकवेळी मी सर्वश्रेष्ठ अभिनय करण्याचा प्रयत्न करीत असते. काही दिवसापूर्वी इंडस्ट्रीजमध्ये नर्वस नायिका म्हणून माझी इमेज झाली होती. मात्र ‘पीके’ या सिनेमाच्या माध्यमातून माझी झालेली नर्वस इमेज बदलून हॉट इमेज तयार केली आहे. यासाठी मला काही जणांनी सहकार्य केले. त्यामुळे मला ही इमेज बदलता आली.’

अनुष्का रणबीर कपूर सोबत टाइम्स ऑफ इंडिया फिल्म पुरस्काराप्रसंगी सहभागी झाली होती. रणबीर आणि अनुष्का अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमाचे सहकलाकार आहेत. हॉट अभिनेत्री अनुष्का शर्माला ‘जब तक है जान’ सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळला आहे. त्यामुळे सध्या ती खुश आहे.

Leave a Comment