संजयकडे राहिले दहा दिवस शिल्लक

अभिनेता संजय दत्तने ठरविले आहे की, तो १८ अप्रैल रोजी पोलिसाकडे सरेंडर करणार आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आगामी काळात संजयला त्याची शुटींग लवकर आटपावी लागणार आहे. त्यामुळे आता त्याने डबल शिफ्ट मध्ये शूट सुरु केले आहे. संजयने त्याच्या सर्व प्रड्यूसर्सना १३ एप्रिल पर्यंत शूटिंग कंप्लीट करण्यास सांगितले आहे. त्यानंतर तो १३ ते १७ एप्रिलला डबिंग करणार आहे.

या नवीन डेडलाइनमुळे दिग्दर्शक राजू हिरानीचा सिनेमा ‘पीके’ वर थोडे प्रेशर पडले आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार संजूचे नव्या सीन संदर्भात प्लैनिंग केली जात आहे. सिनेमाचे काही दिवसाचे काम शिल्लक आहे. १३ एप्रिल पर्यंत काम पूर्ण होणार आहे. संजयकडे डेट्स नसल्याने तो राजकुमार गुप्ताच्या ‘घनचक्कर’ सिनेमातून बाहेर पडला आहे.

आमिर खानला ‘पीके’ सिनेमासाठी त्याचे शेडूल चेंज करावे लागले आहे. को-स्टार संजयकडे सरेंडर होण्यासाठी जास्त वेळ नसल्याने आमिरला त्याचे शेड्यूल चेंज करावे लागणार आहे. मात्र अमीर पहिल्यादा ‘पीके’ सिनेमाची शूटिंग करण्यासाठी राजी झाला आहे.

Leave a Comment